पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी राजीनामा मंजूर केला असून आता नवीन सरकार स्थापन होईपर्यंत आता मोदी हे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
Prime Minister Narendra Modi called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. The Prime Minister tendered his resignation along with the Union Council of Ministers. The President accepted the resignation and requested the Prime Minister and the Union Council of Ministers… pic.twitter.com/SHIj1UMWpY
— ANI (@ANI) June 5, 2024
बुधवारी मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर मुर्मू यांनी तो स्वीकारला. त्यामुळे 5 जूनपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील सत्तास्थापनेपर्यंत देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहणार आहेत.