कोकणासह गोव्याला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

गेले काही दिवस देशातील अनेक भागांमध्ये भयंकर उष्णतेला सामोरे गेल्यानंतर आता हळूहळू राज्यात पावसाची चाहूल लागत आहे. लवकरच पूर्वमोसमी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारी मुंबईसह संपूर्ण कोकणपट्टीत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या अंदाजानुसार कोकण आणि गोवा भागामध्ये 8 ते 9 जून रोजी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीनुसार, कोकण आणि गोवा किनारपट्टीभागात 64.5 मिमी ते 115.5 पासून 204.4 मिमी पर्यंत पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे रहिवाशांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर आवश्यक ती सावधानता बाळगण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.