पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. नरेंद्र मोदी यांना वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले असले तरी यंदा त्यांचा विजय कमी मताधिक्याने झाल्याचे समोर आले आहे. यंदा नरेंद्र मोदी हे अवघ्या दीड लाख मताधिक्याने विजयी झाले आहेत.
2014 ला पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशमधून वाराणसी मतदारसंघाची निवड केली होती. त्या मतदारसंघातून 2014 ला त्यांना 5,81,022 मतं मिळाली होती. त्यावेळी त्यांनी आपचे अरविंद केजरीवाल यांचा तब्बल 3 लाख मतांनी पराभव केला होता.
त्यानंतर 2019 ला लोकसभा निवडणूकीत समाजवादी पार्टी व काँग्रेसचे मार्ग वेगळे झाले होते. त्याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणात झाला होता. 2019 च्या निवडणूकीत मोदींनी 2019 पेक्षा जास्त मतं मिळाली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी यांना 6 लाख 74 हजार 664 मतं मिळाली होती. त्यांनी अजय राय व समाजवादी पार्टीच्या शालिनी यादव यांचा तब्बल 4 लाख 79 हजार 505 रुपयांनी पराभव केला होता.
मात्र 2024 च्या निवडणूकीत मोदींच्या विरोधात लाट असल्याचे दिसून आले आहे. भलेही मोदींच्या मतांमध्ये कमी झालेली नसली तरी त्यांचा विजय हा मोठा विजय ठरलेला नाही.