पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीत कॅमेरे लावून केलेल्या ध्यानाचे आता अनुभवकथन केले आहे. ‘मी ध्यानधारणा सुरू केली तेव्हा सुरुवातीला डोक्यात बराच कोलाहल होता. राजकीय आरोप-प्रत्यारोप, मला दिलेली दूषणं सारं काही आठवलं. डोळ्यात अश्रू तरळले पण नंतर हळूहळू मी शून्यात जाऊ लागलो. मनात विरक्तीचा भाव निर्माण झाला. माझं मन आणि बाहेरचं जग यांचा संबंध लोप पावला, असे प्रवचनच मोदींनी आपल्या एक्स पोस्टमधून दिले.