जम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटचे दोन प्रमुख कमांडर अडकले.
सुरक्षा दलांना पुलवामा येथील निहामा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर चकमक सुरू झाली. जेव्हा सुरक्षा दल आणि पोलिसांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली.
रईस अहमद आणि रियाझ अहमद दार हे दहशतवादी दोघेही दक्षिण कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
‘पुलवामा जिल्ह्यातील निहामा भागात चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दल कर्तव्य बजावत आहेत. पुढील तपशील लवकरच समोर येईल’, असं कश्मीर झोन पोलिसांनी ट्विट केलं आहे.
गोळीबार सुरू असून दोन्ही बाजूंनी अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, असं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.