लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; 48 मतदारसंघांमध्ये 14 हजारांवर अधिकारी-कर्मचारी तैनात

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, 4 जून रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील 48 मतदारसंघांमध्ये 14 हजारांवर अधिकारी-कर्मचारी मतमोजणीसाठी तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी 289 सभागृहांमध्ये 4309 मतमोजणी टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांत घेण्यात आली. 4 जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल फोनला बंदी
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व मतमोजणी पेंद्रांच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी पेंद्रामध्ये मोबाईल पह्न किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.