आज (2 जून ) पासून पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर भक्तांसाठी पूर्ववत खुले करण्यात आले आहे. जतन व संवर्धनाच्या कामामुळे मंदिर अडीच महिने बंद होते. संवर्धनाच्या कामानंतर श्री विठ्ठलाचे पुरातन वैभव पुन्हा नव्याने उजळून आले आहे. देवाच्या पदस्पर्श दर्शना बरोबर वारकरी भाविकांना नव्याने खुलून आलेले मंदिराचे वैभव पाहायला मिळणारा आहे.