Lok Sabha Election 2024 च्या निवडणुकीचा शेवटच्या टप्पा काही तासांवर असून निकालाचा दिवसही जवळ येऊ लागला आहे. निकालासोबतच उत्सुकता आहे ती पंतप्रधानपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या निवडणुकीत पक्षाच्या नेतृत्वाखालील INDIA आघाडीनं भाजपचा पराभव केल्यास देशाचे पंतप्रधान म्हणून राहुल गांधी हे आपली पहिली पसंती असतील असं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी हे केवळ वैयक्तिक मत असून यासंदर्भातील निर्णय निकालानंतरच्या संयुक्त बैठकीत घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एनडीटीव्हीनं यासंदर्भात मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बातचित केली. ज्यामध्ये खरगे यांनी अनेक विषयांवर स्पष्ट भाष्य केलं. प्रियंका गांधी वड्रा यांच्या निवडणूक पदार्पणासाठी त्यांनी प्रयत्न केले होते असंही त्यांनी सांगितलं. मात्र सोनीया गांधी वड्रा यांनी मात्र निवडणूक लढवण्याचा निर्णय रद्द केला आणि त्याऐवजी राहुल गांधी रायबरेलीतून उभे राहिले.
एनडीटीव्हीशी बोलताना खरगे म्हणाले की, राहुल गांधी – ज्यांनी निवडणुकीपूर्वी दोन ‘भारत जोडो यात्रा’चे नेतृत्व केलं आणि त्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रचार केला, मित्रपक्षांसोबत प्रचार केला आणि पंतप्रधान मोदींवर थेट हल्ला चढवला त्यामुळे तेच मुख्य पदासाठी आमची पसंती असतील.
‘पंतप्रधान होण्यासाठी राहुल गांधी हे माझी निवड आहेत आणि ते तरुणांचे आणि विस्तृत पसरलेल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात’, असं खरगे म्हणाले.
मात्र, ‘हे केवळ आपलं मत असून INDIA आघाडी जिंकल्यानंतर पंतप्रधान कोण याचा निर्णय संयुक्तपणे घेतला जाईल’.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे सावधगिरी बाळगली होती आणि INDIA आघाडी संयुक्तपणे निवडणुकीनंतर नेत्याचा निर्णय घेतील’.
गेल्या आठवड्यात खरगे यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवार भाष्य करण्यास नकार दिला होता.
‘हे ‘कौन बनेगा करोडपती’ विचारण्यासारखे आहे’, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला होता.