अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग; अंबानींच्या 800 वऱहाडींसाठी 12 विमाने

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट जुलैमध्ये लग्न करणार आहेत. या विवाहाआधी या जोडप्याचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा उद्या, 28 मे ते 30 मे यादरम्यान केला जाणार आहे. हा सोहळा इटली आणि फ्रान्सच्या समुद्रात क्रूझवर रंगणार आहे. त्यासाठी 800 वऱहाडी असून 12 विमाने सज्ज झाली आहेत. पहिला प्री-वेडिंग सोहळा 1 मार्च ते 3 मार्च यादरम्यान जामनगरमधील रिलायन्स पंपनीचे ऑनिमल रेस्क्यू सेंटर ‘वनतारा’ या ठिकाणी झाला होता. ज्या क्रूझवर प्री-वेडिंग सोहळा होणार आहे. त्या क्रूझचे नाव ‘सेलिब्रेटी असेंट’ असे आहे. या क्रूझला माल्टामध्ये बनवले आहे. हे क्रूझ इटलीच्या पालेर्मो पोर्ट येथून निघाले आणि 4380 किलोमीटरचा प्रवास करून दक्षिण फ्रान्सला पोहोचले. या क्रूझला 2023 मध्ये माल्टात बांधले गेले. या क्रूझचे वजन 1 लाख 40 हजार टन तर प्रवासी क्षमता 3279 आहे, परंतु लग्नाआधीच्या समारंभात 800 पाहुणे असतील.

क्रूझची खास वैशिटय़े

याची किंमत 7475 हजार कोटी रुपये आहे. या क्रूझची क्षमता 3279 प्रवाशांची आहे. क्रूझची लांबी 327 मीटर आणि रुंदी 39 मीटर आहे. 17 डेक क्रूझमध्ये सनसेट बार, पूल डेक, रिसॉर्ट डेक, रिट्रिट, ला व्हॉयेज, 15 रेस्टॉरंट, पॅफे, 12 बार व लाउंज आहेत. यात एक लॅप पूल, 2 हॉट टब पूल, वॉकिंग जॉगिंग ट्रकही आहे. 81 टक्के खोल्यात बाल्कनी ह्यू आहे. 10 टक्के खोल्यात ओशन ह्यू, तर 9 टक्के खोल्यात इनसाइड ह्यू आहे.