डोंबिवली एमआयडीसी स्फोटात 8 जणांचा मृत्यू, 64 जण जखमी

डोंबिवली एमआयडीसीत फेज-2 मधील अंबर केमिकल या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने  8 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 64 जण जखमी झाले आहेत. मृतांत 2 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. आग लागताच 13 बंब दाखल झाले आहेत. बारा टँकर आणि टीडीआरएफचं पथकही बचावकार्यासाठी दाखल झालं आहे. या स्फोटातील जखमींना एम्स व नेपच्युन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.