वेदांतमुळे माझ्या मुलाची शाळा बदलावी लागली – सोनाली तनपुरे

कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारचा अपघातातील अल्पवयीन आरोपीचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. मस्तवाल वेदांत अगरवालमुळे मला माझ्या मुलाची शाळा बदलावी लागली होती असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या पत्नी सोनाली तनपूरे यांनी केला आहे. सोनाली तनपूरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सोनाली तनपूरे यांनी बिल्डर विशाल अगरवालचा अल्पवयीन आरोपी मुलगा वेदांतचे नाव न घेता अप्रत्यक्ष उल्लेख केला आहे.

विशाल अगरवालसह तिघांना पोलीस कोठडी

कल्याणीनगर अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अगरवाल याच्यासह तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी 24 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, अल्पवयीन मुलाला पब कर्मचाऱयांनी मद्य उपलब्ध करून दिले, तर वडिलांनी मुलाला  मोटार चालवायला दिल्याप्रकरणी  पोलिसांनी विशाल अगरवाल याला अटक केली होती. यामध्ये विशाल अगरवाल, ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश गावकर यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

अनधिकृत हॉटेल, पब केले उद्ध्वस्त

बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱया रुफटॉप अािण साईड मार्जिनमधील रेस्टॉरंट, बार, पबच्या विरोधात महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई सुरू केली आहे. बुधवारी मुंढवा, कोरेगाव पार्प, पुणे स्टेशन, कल्याणीनगर, विमाननगर भागातील हॉटेल, पब आदींच्या अनधिपृत शेडवर हातोडा चालविला. या परिसरातील सुमारे 53 हजार 300 स्क्वेअर फुटांचे बांधकाम आणि शेड हटविण्यात आले. मुंढव्यात नदीलगत असलेले वॉटर्स, ओरिला, अनविल्ड, सुपर क्लब हॉटेलवरील अनधिपृत बांधकाम जमीनदोस्त केले.