केंद्रीय गृह मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; मोदी–शहा प्रचारात, कायदा-सुव्यवस्था वाऱयावर

दिल्लीतील तब्बल 100 हून अधिक शाळा, सात मोठी रुग्णालये आणि देशातील सर्वात सुरक्षित तिहार तुरुंग बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची घटना ताजी असताना आता पेंद्रीय गृह आणि वित्त मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यापर्यंत समाजपंटकांची मजल गेली आहे. धमकीचा ई-मेल आल्यानंतर सुरक्षा आणि तपास यंत्रणा तत्काळ कामाला लागल्या.  एकीकडे देशाची सुरक्षा व्यवस्थाच वेठीला धरली गेली असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मशगूल असल्याचे चित्र आहे. त्यांच्या या बेफीकीरीबद्दल देशभरातून संताप व्यक्त होत आहे.

नॉर्थ ब्लॉक येथील पोलिस नियंत्रण कक्षाला बॉम्बच्या धमकीचा ई-मेल आल्याचे दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱयांनी सांगितले. दुपारी 3 वाजता दिल्ली अग्निशमन दलाला बॉम्बच्या धमकीची माहिती मिळाली. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाच्या दोन गाडय़ा आणि दिल्ली पोलीस, बॉम्ब स्क्वॉड पथकही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, घटनास्थळावर कोणतीही संशयित वस्तू आढळली नाही. या महिन्यात 1 मेपासून आतापर्यंत म्हणजेच 22 दिवसांत बॉम्बची धमकी मिळण्याची ही पाचवी घटना आहे.

g याआधी दिल्ली एनसीआरमधील तब्बल 100 हून अधिक शाळा, दिल्लीतील सात मोठी रुग्णालये आणि देशातील सर्वात सुरक्षित तिहार तुरुंग तसेच दहाहून अधिक विमानतळेही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती