ड्रायव्हिंग लायसन्ससंदर्भात नवीन नियम लागू होणार आहेत. याअंतर्गत पूर्वीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. 1 जूनपासून लोकांना ड्रायव्हिंग टेस्ट आरटीओच्या ऑफिसला जाऊन देण्याची गरज पडणार नाही. खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये लोकांना टेस्ट देता येईल. त्यानंतर हे स्कूल यासंदर्भातील सर्टिफिकेट देऊ शकतील.
खासगी ड्रायव्हिंग स्कूल सेंटरकडे किमान 1 एकर जागा असणे आवश्यक असणार आहे. फोर व्हीलरसाठी ट्रेनिंग देण्यात येणार असेल तर अशा वेळी 2 एकर जागा असणे आवश्यक असेल. ट्रेनरकडे किमान डिप्लोमा हवा, पाच वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव, बायोमेट्रिक, आयटी सिस्टमची त्याला माहिती असावी. लाईट मोटार व्हेईकलसाठी आणी हेवी मोटार व्हेईकलसाठी वेगळी ट्रेनिंग आहे.
शुल्क किती? – शिकाऊ लायसन्ससाठी 150 रुपय़े टेस्टसाठी किंवा रिपिट रेस्टसाठी अतिरिक्त 50 रुपये. ड्रायव्हिंग टेस्टसाठी 300 रुपये. लायसन्स जारी करण्यासाठी 200 रुपये लागतील. ड्रायव्हिंग स्कूलने ट्रेनिंगशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. डुप्लिकेट लायसन्स मिळवण्यासाठी 500 रुपये लागतील. लायसन्स जारी करणाऱया ऑथेरिटीच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी पाचशे रुपये लागतील. पत्ता बदलण्यासाठी 200 रुपये.