इंडिगोचे विमान की रेल्वेचा डबा… ओव्हरबुकिंगमुळे प्रवाशावर उभ्याने प्रवास करण्याची वेळ

बस किंवा रेल्वेमधील खचाखच गर्दीमुळे अनेक प्रवाशांवर उभे राहून प्रवास करण्याची वेळ येते. विमानात मात्र असे काही घडत नाही. सगळे आरामात बसून प्रवास करतात, असा तुमचा समज असेल तर तो इंडिगो एअरलाइन्सने खोटा ठरवला. कारण ओव्हरबुक झाल्यामुळे एका प्रवाशावर चक्क उभे राहून प्रवास करण्याची वेळ आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास मुंबईहून वाराणसीला जाणारे इंडिगोचे विमान उड्डाण घेण्यासाठी रनवेवर पोहोचले. तितक्याच क्रू मेंबरची नजर विमानाच्या मागच्या बाजूला उभ्या असलेल्या एका प्रवाशावर गेली, जो बसण्यासाठी जागेची शोधाशोध करत होता. क्रू मेंबरने या घटनेची माहिती वैमानिकाला दिली. यानंतर विमान पुन्हा रनवेवरून पुन्हा टर्मिनलवर आणण्यात आले, मात्र यासंदर्भात एअरलाइन्सकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

विमान टर्मिनलवर परत आणले

सामान्यतः एअरलाइन्स रिकाम्या जाऊ नयेत म्हणून पंपन्यांकडून फ्लाईट ओव्हरबुक केली जाते. विमान टर्मिनलवर परतल्यानंतर त्या व्यक्तीला उतरवण्यात आले. विमान पंपन्यांकडून प्रत्येकाच्या केबिनचे सामान तपासण्यात आले आणि विमानाचे टेकऑफ सुमारे एक तास उशिराने झाले. 2016 मध्ये डीजीसीएमने जारी केलेल्या नियमांनुसार, विमानाने उड्डाण केल्यानंतर एका तासाच्या आत प्रवाशाला दुसरे विमान उपलब्ध करून दिल्यास त्या प्रवाशाला कोणतीही भरपाई द्यावी लागत नाही.