जगभरातून थोडक्यात आणि सुटसुटीत बातम्या…

खाणीतील कचऱयात सापडला खजिना

दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग शहरात खाणीतील कचऱयाच्या ढिगामध्ये अदृश्य सोन्याचा खजिना सापडला आहे. तब्बल 24 अब्ज डॉलरचे हे सोने आहे. मास्टर डिग्रीच्या अभ्यासादरम्यान एका विद्यार्थ्याने यावर संशोधन केले. स्टिव चिंगवारू असे विद्यार्थ्याचे नाव असून तो स्टेलनबाश युनिव्हर्सिटीमध्ये शिकतोय.

 

हिंदुस्थानी व्यक्तीला 30 महिन्यांची शिक्षा

सिंगापूरमध्ये मूळचा हिंदुस्थानी नागरिक डिलिव्हरी ड्रायव्हरला 30 महिन्यांची शिक्षा ठोठावली. शिवम करूप्पन (42) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो एका कंपनीत डिलिव्हरी ड्रायव्हरचे काम करत होता. मांसाच्या उत्पादनाची चोरी करून ती विकण्याचा त्याच्यावर आरोप आहे.

पाण्याखाली राहून वय 10 वर्षांनी कमी केले

अटलांटिक महासागराच्या खोल पाण्यात 93 दिवस राहून एका इसमाने आपले वय 10 वर्षांनी कमी केले. निवृत्त नौदल अधिकारी जोसेफ दुतुरी हे तीन महिने अटलांटिक महासागरात एका कॉम्पॅक्ट पॉडमध्ये वास्तव्य करून होते. पाण्याच्या खाली राहण्याचा पहिला विश्वविक्रम 73 दिवसांचा होता.

यूपीची नॅन्सी त्यागी कान्सच्या रेड कार्पेटवर

बाहुल्यांचे कपडे शिवणारी उत्तर प्रदेशमधील एक तरुणी थेट फ्रान्समधीलकान्स फिल्म फेस्टिव्हलमधील रेड कार्पेटवर दिसली. या तरुणीचे नाव नॅन्सी त्यागी असून ती सोशल मीडियावर आपले व्हिडीओ अपलोड केल्याने प्रसिद्धीच्या झोतात आली होती. नॅन्सी एक ड्रेस डिझायनर आणि सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर आहे.

विमानाचे हवेत हेलकावे, एक ठार, 30 जखमी

लंडनहून सिंगापूरला जात असलेले सिंगापूर एअरलाइन्सचे एका विमानाला एयर टर्बुलेंसचा सामना करावा लागला. 777-300ईआर फ्लाइट विमानाला जोरदार झटका बसल्याने यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून अन्य 30 जण जखमी झाले आहेत. यामुळे विमानाला इमरजन्सी बँकॉकमध्ये लँडिंग करण्यात आली. या विमानात 211 पॅसेंजर आणि 18 क्रू मेंबर होते. या विमानाला हवेत असताना नेमके काय झाले होते हे अद्याप समोर आले नाही.