>>सूरज बागडे, भंडारा
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयांत जागोजागी दुर्गंधीचा व अस्वच्छता पसरली आहे. राज्यातील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या रुग्णालयात भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला तिसरा क्रमांक मिळाला होता. मात्र, दिव्याखाली अंधार सारखी परिस्थिती आता या रुग्णालयात उघड झाला आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्वच्छता पसरली आहे. सगळीकडे घाणीचे साम्राज्य असुन डॉक्टर मात्र अनभिज्ञ आहेत.भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात सगळीकडे अस्वच्छता पसरली आहे. पायऱ्यांवर, दरवाज्याच्या कोपऱ्यात, जिथे मिळेल तिथे पांढऱ्या भिंती रंगीत दिसतं आहे. तर काही ठिकाणी अन्न पडलेलं आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तर तापमानाचा पारा 42 पार झाला असल्याने रुग्णांना थंड हवा मिळावी म्हणुन कुलर लावण्यात आले होते. पण हे कुलर कोरडेच असून त्यात पाणीच घातला जात नाही.
दररोज जिल्ह्यातील हजारो रुग्ण रूग्णालयात येत असतात. नुकताच जिल्ह्याला रुग्णालयाला राज्यातून तिसरा क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पण वास्तव परिस्थिती वेगळी असल्याचं दिसून आलं आहे. रुग्णालयातील घानी संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांना विचारले असताना त्यांनी या विषयी बोलण्यास टाळले.