Lok sabha election 2024 voting update : महाराष्ट्रात 3 वाजेपर्यंत 38.77 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मुंबईतील 6 जागांसह राज्यात एकूण 13 जागांवर आणि देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.

पराभवाच्या भीतीने शिवसैनिकांना अटक; पोलीस, निवडणूक आयोगावर भाजपचा दबाव, संजय राऊत यांचा संताप

  • दुपारी तीन वाजेपर्यंत भिवंडीत 37.06 टक्के, धुळ्यात 39.97 टक्के, दिंडोरीत 45.95 टक्के, कल्याणमध्ये 32.43 टक्के, उत्तर मुंबईत 39.33 टक्के, मुंबई उत्तर मध्य विभागात 37.66 टक्के, ईशान्य मुंबईत 39.15 टक्के मतदान
  • महाराष्ट्रात 3 वाजेपर्यंत 38.77 टक्के मतदान
  • शिवसेना नेते अनिल परब यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

  • अभिनेता आमिर खान आणि पूर्वश्रमीची पत्नी किरण राव यांनी मुंबईत बजावला मतदानाचा हक्क

  • राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • महाराष्ट्रात दुपारी 1 वाजेपर्यंत 27.78 टक्के मतदान

मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी मतदान करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन

  • शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • महाराष्ट्रात सकाळी 11 वाजेपर्यंत 15.96 टक्के मतदान

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

धगधगणारी क्रांतीची ज्वाला पेटत रहायला हवी, हुकूमशाही गाडून टाकायला हवी! मतदान करण्याचे आदित्य ठाकरे यांचे आवाहन

  • महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदान
  • धुळे- 6.92 टक्के, दिंडोरी- 6.40 टक्के, नाशिक – 6.45 टक्के, पालघर- 7.95 टक्के, भिवंडी- 4.86 टक्के, कल्याण – 5.39 टक्के, ठाणे – 5.67 टक्के, मुंबई उत्तर – 6.19 टक्के, मुंबई उत्तर प. – 6.87 टक्के, मुंबई उत्तर पूर्व – 6.83 टक्के, मुंबई उत्तर मध्य – 6.01 टक्के, मुंबई दक्षिण मध्य- 7.79 टक्के, मुंबई दक्षिण – 5.34 टक्के मतदान

  • ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी केले मतदान

  • अभिनेता सुनील शेट्टी याने बजावला मतदानाचा हक्क

  • भिवंडी लोकसभा मतदारसंघातील व कल्याण तालुक्यातील रायते विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रायते या मतदार केद्रात रूम नंबर 3 मधील मशीन सकाळी 7 वाजता बंद पडले. तब्बल दीड तास झाला तरी मशीन चालू झाली नाही. या मुळे मतदारांमध्ये नाराजी पसरली असून आम्हाला जेवढे तास बंद पडले आहे तेवढे तास मतदान करण्यास वेळ द्या अशी मागणी मतदारांनी केली आहे.
  • बदलापूरमध्ये 52 मिनिटं उशिरा सुरु झाले मशीन; मतदार केंद्र बंद, पहिल्या मतदाराने 7 वाजून 52 मिनिटांनी केलं मतदान
  • शिवसेना उमेदवार भारती कामडी यांनी सहकुटुंब मतदान केले

  • शिवसेना उमेदवार वैशाली दरेकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

  • अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने केले मतदान

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. हा अभिमानाचा क्षण असून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन त्यांनी केले.

  • अभिनेता राजकुमार राव याने बजावला मतदानाचा हक्क
  • अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह यांनी वर्सोवा येथे बजावला मतदानाचा हक्क

  • ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी जुहूतील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

  • अभिनेत्री जान्हवी कपूर हिने केले मतदान

  • 100 टक्के विजयाची हॅटट्रीक करणार, शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला ठाम विश्वास

  • अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शक झोया अख्तर यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • अभिनेता अक्षय कुमार याने रांगेत उभे राहून केले मतदान

  • उद्योजक अनिल अंबानी यांनी बजावला मतदानाचा हक्का