उत्तर मध्यसह मुंबईचे प्रश्न सोडवणार – वर्षा गायकवाड

खासदार म्हणून निवडून आल्यावर मुंबईतील मोकळय़ा जागांचे संवर्धन करणे, झाडांची कत्तल होऊ नये, विमानतळ फनेल झोनमधील पुनर्वसनासाठी विशेष धोरण, मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलची संख्या वाढवणे, लांब पल्ल्याच्या रेल्वेचा दर्जा उंचावणे, हाऊसिंग सोसायटय़ांवर लावलेला अन्यायकारक जीएसटी कमी करणे, मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

निवडून आल्यानंतर मुंबईकरांसाठी काय करणार यासाठीचे न्यायपत्र वर्षा गायकवाड यांनी आज प्रसिद्ध केले. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, काँग्रेसचे सचिव बी. एम. संदीप, आमदार अमीन पटेल, प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत, संघटन प्रभारी प्रनिल नायर, खजिनदार संदीप शुक्ला, प्रवक्ते युवराज मोहिते, सुरेशचंद्र राजहंस, आनंद शुक्ला, महेंद्र मुणगेकर आदी उपस्थित होते.