मोदींच्या ‘रोड शो’ने मुंबईची वाट लगा दी ना पापा! मेट्रो बंद केल्याने घाटकोपर स्टेशनवर चेंगराचेंगरीची स्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घाटकोपर येथील रोड शोसाठी एलबीएस मार्ग बंद करण्यात आल्यामुळे शीव ते मुलुंडदरम्यान सायंकाळच्या वेळी प्रचंड वाहतूककाsंडी झाली. मेट्रोदेखील अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशी अडकले. घाटकोपर स्टेशनवर तर चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. त्यात बेस्टचे अनेक मार्ग वळवल्याने मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मोदींच्या रोड शोने ‘मुंबईची वाट लगा दी ना पापा,’ असेच म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर आली.

देशात ‘चारशे पार’चा नारा दिला असला तरी याआधी दोन वेळा झालेल्या प्रचंड फसवणुकीमुळे जनतेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पायाखालची वाळू सरकलेल्या मोदींकडून महाराष्ट्र पिंजून काढला जात आहे. खुद्द नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात सुमारे 20 जाहीर सभा घेतल्या व रोड शो आयोजित करण्यात आले. महाराष्ट्रात मिंधे-भाजपचे सरकार असले तरी गद्दारीने बनलेले हे सरकार जनता उलथवून टाकण्याच्या मनःस्थितीत आहे. या असंतोषाचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत बसण्याचा धोका भाजपला सतावत आहे. त्यामुळे भाजपच्या दिग्गज नेत्यांसह गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात वारंवार यावे लागत आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवार, 20 मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे मोदी यांचा घाटकोपर येथे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारासाठी रोड शो आयोजित करण्यात आला. मात्र ऐन सायंकाळच्या वेळी झालेल्या या रोड शोमुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

वाहतुकीचे तीनतेरा, मुंबईकरांमध्ये संताप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोसाठी मुंबई मेट्रो बंद ठेवण्यात येणार असल्याचे सायंकाळी 6 वाजल्यानंतर अचानक जाहीर करण्यात आले. यासाठी घाटकोपर स्थानकाचे सर्व दरवाजे अचानक बंद करण्यात आले. यामुळे स्टेशनबाहेर प्रचंड गर्दी जमा झाली. परिणामी मेट्रोच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

‘बेस्ट’चे 32 मार्ग वळवले, प्रवाशांचे हाल

– मुंबईकरांचे महत्त्वाचे साधन असलेल्या बेस्ट बसचे तब्बल 32 मार्ग अचानक सायंकाळी 6.30 वाजता वळवल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे स्टॉपवर बेस्टची वाट पाहणाऱया मुंबईकरांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. लालबहादूर शास्त्र्ााr मार्गावर मोदींचा रोड शो होत असल्यामुळे बस मार्गात बदल करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले.

अरेरे…14 मृत्यू होऊनही संवेदना नाही!

– घाटकोपर छेडानगर येथे सोमवारी झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत तब्बल 14 जणांना नाहक आपला जीव गमवावा लागला. यात कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने अनेक संसार उघडय़ावर पडले. या दुर्घटनेचे बचावकार्यही अजून सुरू आहे. असे असताना कोणत्याही संवेदना न बाळगता, घटनेबद्दल कोणतेही दुःख व्यक्त न करता, श्रद्धांजलीही न वाहता वाजतगाजत मोदींचा रोड शो पार पडल्याने सर्वसामान्यांमधून मिंधे-भाजपला संवेदना नसल्याचा संताप व्यक्त होत आहे.

सत्तापिपासू भाजपचा संवेदनशीलपणा संपलाय – विजय वडेट्टीवार

– भ्रष्ट महायुतीमुळे मुंबईमध्ये घडलेल्या हार्ंडग दुर्घटनेत 18 जणांना जीव गमवावा लागला आहे तरीदेखील भाजपच्या रॅली, रोड शो थांबत नाहीत. सत्तापिपासू भाजपचा संवेदनशीलपणा संपल्याचे यातून स्पष्ट होत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मुंबईत घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर खरे तर भाजपने मोदींची रॅली रद्द करायला हवी होती. पण होर्डिंग दुर्घटना स्थळाजवळून पंतप्रधानांची रॅली भाजप काढत आहे. भाजप मृतदेहावरून रॅली काढतंय काय? असा संतप्त सवाल विजय वडेट्टीवार यांनी मोदींच्या रोड शोवरून भाजपला केला आहे.

मोदींच्या सभेसाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर – अंबादास दानवे

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी शासकीय यंत्रणेचा वापर करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केली. त्यासंदर्भात त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र दिले आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार असल्याने त्यांच्या सभा होत असलेल्या ठिकाणी रस्त्यांची डागडुजी व स्वच्छतेवर स्थानिक प्रशासनांकडून मोठय़ा प्रमाणात खर्च केला जात आहे. कोल्हापूर येथील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तर विमानतळापासून सभेच्या ठिकाणापर्यंतच्या रस्त्याची डागडुजी व स्वच्छतेची कामे कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात आली आहेत. हा एक प्रकारे निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.