जगभरातील श्रीमंत लोकांमध्ये दुबईमध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्याची क्रेझ सतत वाढत आहे. दुबईत हिंद्स्थानमधील बडया बडया श्रीमंत 29,700 लोकांकडे 35 हजार मालमत्ता आहेत. या मालमत्तांची किंमत तब्बल 1.42 लाख दीड कोटी इतकी आहे. सेंटर फॉर ऍडव्हान्स्ड डिफेन्स स्टडीजच्या एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 58 देशांमधील 74 मीडिया हाऊसने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालाला ‘दुबई अनलॉक’ असे नाव देण्यात आले आहे. ‘दुबई अनलॉक’ या अहवालात 2020 ते 2022 पर्यंत दुबईतील परदेशी लोकांच्या संपत्तीचा तपशील शेअर करण्यात आला आहे. या यादीत हिंदुस्थानातील लोकांची नावे सर्वात वर आहेत. संपत्तीच्या बाबतीत पाकिस्तान दुसऱया क्रमांकावर आहे. येथील 17 हजार लोकांकडे जवळपास 23 हजार मालमत्ता आहेत. त्यांची एकूण किंमत 91.8 हजार कोटी रुपये आहे.
अंबानींची 2 हजार कोटींची मालमत्ता
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची दुबईमध्ये 2 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. लुलू ग्रुपचे चेअरमन एमए युसूफ अली आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे 585 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.