प्रशासनाने जनजागृतीसाठी धावपळ करूनही नगरमध्ये मतदानाचा टक्का घटला

मिलिंद देखणे

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांचा टक्का वाढावा ही अपेक्षा सर्वांचीच असते नागरिकांचा सहभाग यंदा सुद्धा दिसून आलेला नाही त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये किमान दीड टक्के मतदान कमी झालेले आहे .एकंदरीतच कोट्यवधी रुपयांच्या खर्च करून नेमकं काय साध्य झालं प्रशासनाने नेमकं काय केलं असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे.

नगर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 1 लाख 28 हजार 741 मतदान वाढले आहे. हे वाढलले मतदान कोणासाठी लाभदायक ठरणार, हे आता 23 मे रोजी स्पष्ट होणार आहे. दरम्यान, नगर मतदारसंघात यंदा 64.26 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा हा उच्चांक ठरला होता.

जिल्ह्यामध्ये नगर व शिर्डी हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. नगर मतदारसंघात एकूण 18 लाख 54 हजार 248 मतदार होते, या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान झाले असून त्यामध्ये एकूण मतदारांपैकी 11 लाख 91 हजार 521 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 6 लाख 52 हजार 574 पुरुष तर 5 लाख 38 हजार 939 महिला मतदारांचा समावेश आहे. नगर मतदारसंघात एकूण मतदारांमध्ये 88 इतर मतदार होते. त्यापैकी 8 मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. विशेष म्हणजे मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नगर मतदारसंघामध्ये 16 लाख 72 हजार 282 मतदारांपैकी 10 लाख 62 हजार 780 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्या तुलनेत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांची संख्या यंदा तब्बल 1 लाख 28 हजार 741 ने वाढली आहे. हे वाढलेले मतदान कोणत्या उमेदवाराला फायद्याचे ठरणार हे विषय झाले होते.

मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम

जिल्ह्यामध्ये मतदान टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वीप-2 अंतर्गत विविध उपक्रम राबवत मतदारांमध्ये जागृती केली होती. याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महसूल, पोलिस आणि इतर यंत्रणांमधील समन्वय राखण्यासाठीतत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केलेले नियोजन आणि विविध यंत्रणांची त्यांना मिळालेली साथ यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडलीहोती. त्याचबरोबर नवमतदारांचा उत्साह, ज्येष्ठ नागरिकांनी मतदानासाठी लावलेल्या रांगा, सखी मतदान केंद्राच्या संकल्पनेने मतदारांमधील उत्सुकता यामुळे मतदानाचा टक्काही वाढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

यांना सुद्धा नगर जिल्ह्यामध्ये मद्रासी टक्केवारी वाढावी याकरता विविध प्रकारचे उपाय योजना या करण्यात आल्या होत्या, पण अगदी महाविद्यालयाच्या स्तरापासून ते शालेय स्तरापर्यंत विविध प्रकारच्या स्पर्धा सुद्धा या घेण्यात आलेला होत्या .युवा वर्गामध्ये मतदानाची जागृती व्हावी याकरिता सुद्धा विविध प्रकारच्या उपयोजना राबवण्यात आलेल्या होत्या. एवढेच नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांना शंभर टक्के मतदान कशा पद्धतीने होईल याकरता सुद्धा गणिती आखली गेली विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा खर्च सुद्धा यासाठी करण्यात आलेला होता. कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदानाची गुणवत्ताची आकडेवारी ही वाढली पाहिजे हा त्यांना उद्देश होता ,पण यंदा नगर जिल्ह्यामध्ये झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून मतदारांमध्ये निरुचाह हा पाहायला मिळाला. तुम्ही जागृती करा आणि काही करा तरी जनतेला मात्र जे करायचं तेच ते करते हे यावरून सिद्ध झालेले आहे. एक प्रकारे प्रशासनाने नेमकी जी भूमिका घेतली त्याला कितपत यश मिळालं हा सुद्धा खरा प्रश्न असा उपस्थित झालेला आहे .

एकीकडे प्रशासन कामाला लावायचं निवडणुकीच्या काळामध्ये पार अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना जागृती मध्ये अडकून टाकायचं त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करायचे एवढे होऊन देखील सुद्धा पदरामध्ये जर काहीच मिळत नसेल तर नेमकं हे जे काही कॅम्पेअर म्हणा किंवा जागृती ही नेमकी कोणासाठी केली आणि काय केली असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे. वास्तविक पाहता मतदानाची प्रक्रिया अधिक सुलभ व सोय सोयीस्कर व्हावी याकरता बघणे गरजेचे होते. जे प्रत्यक्षात मतदानाच्या ठिकाणी येतात त्यांना नेमकं काय अडचणी अडचणी येतात हे पाहणे गरजेचे होतं आजही ज्या ज्याच्या असचणी आहे ते याच्या मध्ये नाव न असल्यामुळे अनेकांना माघारी परतावे लागलेले आहे ,मग याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झालेला आहे, काही ठिकाणी तर एखादं व्यक्ती जिवंत असताना त्याला मृत दाखवण्यात आलेला आहे किंवा त्याच्या नावापुढे असलेला फोटो सुद्धा हा दुसऱ्याचा फोटो लावण्यात आलेला आहे मला जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे म्हणजेच एकंदरीत एखाद्या व्यक्ती मतदानापर्यंत पोहोचतो मात्र त्याला मतं करता येत नाही किंवा अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते यासाठी प्रशासनाने अगोदर तोच उपाययोजना करून त्याचे प्रत्यक्षात मतदान कशा पद्धतीने घडले पाहणे गरजेचे होतं पण त्या पद्धतीचे उपाययोजनात झालेला आहे त्यामुळे आज याच आकडेवारीवर आपल्याला भाग्य कामाला लागलेली आहे

2024 साली नगर लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 63.77% एवढे मतदान झालेले आहे मागील वर्षाच्या तुल्यमध्ये दीड टक्का मतदान हे कमी झालेले आहे शेवगाव तालुक्यामध्ये 62.74 राहुरी मध्ये 69.79 पारनेर मध्ये 63.97 नगर शहर 57.60 श्रीगोंदा 62.54 कर्जत जामखेड 65.61 असे मतदान झालेले आहे.

…तर जनजागृतीचे फलित काय?

मतदार जागृतीसाठी शासन, प्रशासनाच्या पातळीवर व्यापक स्वरूपात उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी यावर्षीही मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात आला. त्यासाठी बँड अॅम्बेसिडर क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरसह अनेकांना निवडणूक आयोगाने या मोहिमेत सहभागी करून घेतले. मतदानाबाबत जनतेत जागृती करण्यास दुमत नाही. परंतु ते करताना प्रशासकीय कामकाजातही सुधारणा होणे महत्त्वाचे आहे. आता जर तेंडूलकर याच्या एका फोन कॉलमुळे एखादी व्यक्ती मतदान केंद्रात मतदानासाठी येत असेल आणि तिचाच मतदार यादीत मयत असा उल्लेख अथवा तिच्या नावावर डिलेटेड शिक्का मारला गेला असेल तर या जनजागृती मोहिमेचे फलित काय? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे.

बिनचूक याद्यांसाठी प्रयत्नांची आवश्यकता मतदार याद्यांमधील हा सावळा गोंधळ आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी दूर केला जाईल का? ही शंकाच आहे. प्रशासनाने स्वीप समितीसारख्या समित्या स्थापन करून बक्षिसे, पारितोषिके जाहीर करून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणले परंतु त्यांच्या नावांबाबत याद्यांमध्ये त्रुटी असतील त्याला जबाबदार कोण? प्रशासनाने व्यापक जनजागृतीबरोबरच मतदार याद्यांमधील चुकाही तितक्याच तत्परतेने टाळल्या तर मतदारांना होणारा मनःस्ताप, गैरसोय टळून मतदानाचा टक्का निश्चित वाढेल. पण त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली कार्यतत्परता आणि कार्यक्षमता दाखविणे गरजेचे आहे.

संगणक युगातही मतदान आकडेवारीचा घोळ सुरूच निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत असताना प्रशासनाकडून झालेल्या मतदानाची आकडेवारी तास-दोन तासांनी दिली जात होती. मतदान संपल्यानंतर रात्री उशिरा झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. मात्र त्यानंतरही ती दोन-तीन वेळा अपडेट करण्यात आली असली तरी मंगळवारी (दि. 14) दुपारपर्यंतही मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली नव्हती. मतदान यंत्रावर मतदान घेण्यात आले. संगणकावर आकडेमोड करण्यात आली. मग अंतिम आकडेवारीचे ‘घोडं’ कुठं अडकलं, असा सवाल उपस्थित होत आहे. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जर आकडेवारी संकलित करण्यास मोठा वेळ लागत असेल तर तंत्रज्ञानाचा फायदा काय? प्रशासनाने तीन ते चार वेळा अपडेट केलेली आकडेवारी पाहून नागरिकांच्या मनातही संभ्रम आणि शंका निर्माण होत आहेत.

याद्यांमधील त्रुटींमुळे अनेक ठिकाणी वादविवाद अहमदनगर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावत उत्स्फूर्तपणे मतदान केले. नगर शहरासह ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसला परंतु मतदार याद्यांमधील ‘त्रुटीं’ मुळे अनेकांना मनःस्ताप सहन करावा लागला. मतदानासाठी आलेल्या व्यक्तीच्या नावापुढे मयत असा उल्लेख असल्याने मतदान करण्यास मज्जाव केल्याच्या घटना सकाळच्या सत्रातच उघडकीस आल्या. त्यामुळे वादावादी आणि तक्रारीही झाल्या. त्यानंतर या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या आदेशानुसार यादीतील मयत परंतु प्रत्यक्ष जिवंत असलेल्या मतदारांना ‘टेंडर्ड वोट’ करण्यास परवानगी देण्यात आली. टेंडर्ड वोट करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु यातून प्रशासनाचा गलथान कारभारच चव्हाट्यावर आला असून, मतदारांनी त्याबाबत संताप व्यक्त केला आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवीन मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती, दुबार नावे वगळणे, मयताची नावे रद्द करणे यासाठी वर्षभरात अनेक विशेष मोहिमा राबविल्या जातात. मात्र या मोहिमांमध्ये मतदारांनी केलेली नोंदणी, सुचविलेले बदल आणि त्यासाठी भरून दिलेले विविध फॉर्म व्यवस्थितरित्या हाताळले जात नसल्याने मतदारयाद्यांमध्ये सावळा गोंधळ निर्माण होतो. यावेळीही असाच प्रकार समोर आला आहे.

18 वर्षावरील अनेक तरुण-तरुणींनी मतदानासाठी यावेळी नावनोंदणी केली होती. त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून ते महापालिकेने नेमलेल्या बीएलओमार्फत जिल्हा निवडणूक शाखेकडे देण्यात आले. या नवमतदारांना मतदानाचा हक्क मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अशी नावनोंदणी करणाऱ्या अनेक नवमतदारांची नावे यादीत आलीच नाहीत. त्याचबरोबर जे मतदार सुदृढ आहेत, त्यांचा अंध, अपंग असा उल्लेख यादीत आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत मतदारांमधून संताप व्यक्त होत आहे.

मतदार सरकारदरबारी ‘मयत’, अनेकांच्या नावावर डिलेटेडचा शिक्का, आकडेवारीतही गोंधळ

– लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि. 13) नगर आणि शिर्डी मतदारसंघात मतदान पार पडले. यंदा प्रथमच मतदारांनी उत्स्फूर्तपणे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला. परंतु मतदार याद्यांमधील सावळ्या गोंधळाचा फटका मतदारांना सहन करावा लागला. प्रशासनाच्या बेफिकीर कामकाजामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले. अनेक मतदारांना जिवंत असतानाही ‘मयत’ दाखवून जिल्हा प्रशासनाने ‘यमसदनी’ धाडले, तर अनेक मयत व्यक्ती मतदार यादीतून जिवंत केल्या गेल्या. अनेक मतदारांच्या नावावर ‘डिलेटेड’ असे शिक्के मारले गेल्याने त्यांना मतदान करता आले नाही. मतदार यादांमधील या त्रुटींमुळे अनेक मतदान केंद्रावर केंद्र अधिकारी, कर्मचारी आणि मतदारांमध्ये वादंगाचे प्रसंग ओढावले. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मागील कित्येक वर्षापासून देशभरात निवडणुका घेतल्या जातात. परंतु आजतागायत मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आली नाही.

दृष्टीक्षेपात 2014 च्या लोकसभेसाठी झालेले मतदान :

एकूण मतदार : 16 लाख 72 हजार 282
प्रत्यक्ष झालेले मतदान : 10 लाख 62 हजार 780
मतदानाची टक्केवारी : 63.55

2019 च्या लोकसभा निवडणुकीतील मतदान :
एकूण मतदार : 18 लाख 54 हजार 248
प्रत्यक्ष झालेले मतदान : 11 लाख 91 हजार 521
झालेल्या मतदानाची टक्केवारी : 64.26

यंदा विधानसभा मतदारसंघानिहाय झालेले मतदान :

विधानसभा मतदारसंघ      एकूण मतदान            प्रत्यक्ष झालेले मतदान               मतदानाची टक्केवारी
शेवगाव                3 लाख 38 हजार 788       2 लाख 14 हजार 785                 63.40 टक्के
राहुरी                  2 लाख 88 हजार 127       1 लाख 92 हजार 386                 66.77 टक्के
पारनेर                 3 लाख 17 हजार 8           2 लाख 9 हजार 799                   66.18 टक्के
नगर शहर            2 लाख 85 हजार 913        1 लाख 72 हजार 276                 60.25 टक्के
श्रीगोंदा                3 लाख 9 हजार 324          2 लाख 302                            64.75 टक्के
कर्जत-जामखेड      3 लाख 15 हजार 88          2 लाख 1 हजार 973                   64.10 टक्के