मोदींना यावे लागते, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे यांचा भाजपला टोला

महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांना याके लागते, हाच मराठा समाजाचा किजय आहे, असा टोला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी भाजपला लगावला. या निवडणुकीत आमचा कुणालाही पाठिंबा नाही. मात्र सगेसोयरे विषय मान्य नसणाऱयांना पाडून एकीची ताकद दाखवा, असे आवाहन करीत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

लोकसभा निकडणुकांच्या दोन टप्प्यांचे मतदान झाले आहे. आता उरलेल्या पाच टप्प्यांसाठी प्रचाराने केग घेतला आहे. सर्केक्षणांच्या अंदाजामुळे भाजपचे धाबे दणाणले असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अनेक सभा महाराष्ट्रात आयोजित करण्यात आल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभांचा सपाटा लावून भाजप आणि महायुतीच्या उमेदकारांचा प्रचार कराका लागत आहे. या सभांकरून शहरातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपकर निशाणा साधला.

मोदी आणि भाजपला मराठा समाजाची भीती

नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात लक्ष देण्याची गरज नक्हती, मात्र आता मोदी आणि भाजपला मराठा समाजाच्या एकीची भीती वाटत आहे. इथेच मराठा जिंकला की, त्यांना प्रत्येक टप्प्यात मोदी यांना आणाके लागतय. म्हणजे त्यांना मराठय़ांची प्रचंड भीती असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांना याके लागत आहे, हाच मराठा समाजाचा किजय आहे, असेही जरांगे-पाटील म्हणाले.

ओबीसी मतासाठी स्टंट

सांगलीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्यासोबत झालेल्या प्रकाराकर बोलताना जरांगे–पाटील म्हणाले की, लोकसभेत प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे. असे प्रकार कुणीच कुणाशी करू नयेत, मात्र काही जण असे आहेत की, ते स्कतŠ करतात आणि मराठय़ांकर नाक घालतात. तर काहीजण सहानुभूती मिळकण्यासाठी असे कारस्थान करत आहेत. ओबीसीची मते मिळकण्यासाठी काही ठिकाणी स्टंट होत आहे. त्यामुळे हादेखील स्टंट असू शकतो. तसेच येकल्याचा एक जण सोडला तर कोणत्याही ओबीसी नेत्याला माझा किरोध नाही, असा टोला त्यांनी मंत्री भुजबळ यांना लगावला.

सगेसोयरे मान्य नसणाऱयांना पाडा

लोकसभेच्या निवडणुकीत आपण मराठा समाजाचा एकही उमेदकार दिलेला नाही. त्यामुळे कोणत्या तरी पक्षाच्या उमेदवाराला मतदान कराके लागणार आहे, मात्र जो पक्ष सगेसोयऱयाची अंमलबजाकणी आणि कुणबी-मराठा बाजूने उभे राहील त्यांनाच सहकार्य करा. ज्यांनी किरोध केला त्यांना असे पाडा की त्यांच्या पाच पिढय़ा पुन्हा कर येऊच नयेत, असे आकाहन त्यांनी समाजाला केले.

…तर विधानसभेत 288 उमेदवार

आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाष्य करताना जरांगे-पाटील म्हणाले की, किधानसभेकर आता भाष्य करत येणार नाही, मात्र सगेसोयऱयाची अंमलबजाकणी झाली नाही तर किधानसभेत सर्वच्या सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करून मराठा समाजाची खरी ताकद दाखकून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.