मोदींवर टीका करणाऱया भाजप पदाधिकाऱयाला अटक

भाजप नेता आणि बिकानेर अल्पसंख्याक विभागाचा माजी अध्यक्ष उस्मान गनी याला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली म्हणून अटक करण्यता आल्याचे वृत्त आहे. मोदी यांनी राजस्थानात मुस्लिम समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर गनी याने प्रत्युत्तर दिले. त्याने केलेल्या वादग्रस्त विधानावर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले.

पंतप्रधानांवर केलेल्या विधानानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचे वाहन त्याच्या घरी पाठवण्यात आले होते. मात्र तो दिल्लीत होता. दिल्लीहून आल्यानंतर तो पोलीस ठाण्यात पोहोचला आणि माझ्या घरी वाहन कसे पाठवले म्हणून हुज्जत घालू लागला. तो कोण आहे हे आम्हालाही माहीत नव्हते. पोलीस स्थानकासमोर नाकाबंदी करण्यात आली होती. तिथे जाऊन त्याने बाचाबाची केल्याने आम्ही त्याला अटक केल्याचे बिकानेरच्या मुक्ता प्रसाद पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरेंद्र शेखावत यांनी सांगितले. काँगेस सत्तेवर आली तर हिंदूंची संपत्ती ते जास्त मुले असलेल्यांना वाटतील. तुमची मंगळसूत्रेही खेचतील असे विधान मोदी यांनी राजस्थानमधील बांसवाडा येथील सभेमध्ये केले होते.