T20 विश्वचषकासाठी यष्टीरक्षक कोण होणार? या तीन खेळाडूंच्या नावाची चर्चा

IPL 2024 चा यंदाचा हंगाम चांगलाच गाजत आहे. दरम्यान, आगामी टी-20 विश्वचषकासाठी खेळणाऱ्या संघाविषयी चर्चा सुरू झाली आहे. त्यात तीन खेळाडूंची नावं यष्टीरक्षकाच्या यादीत असून त्यापैकी कुणाची वर्णी लागणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

यात पहिलं नावं ऋषभ पंत याचं आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत चांगलाच फॉर्मात आलाय. ऋषभ पंतने या हंगामात आतापर्यंत चांगली फलंदाजी केली असून यष्टिरक्षक म्हणूनही उत्तम कामगिरी केली आहे. पंतच्या या कामगिरीमुळे तो 2024 च्या टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचा मुख्य यष्टीरक्षक असेल अशी चर्चा सुरू आहे.

ऋषभ पंतने टी 20 विश्वचशकासाठी यष्टिरक्षकाचे सूत्र हाती घ्यावे असे ऋषभ पंतच्या आणि टीम इंडियाच्या अनेक चाहत्यांचे मत आहे. मात्र विश्वचषकासाठी संघाला स्टँडबाय यष्टीरक्षकाचीही गरज आहे. यामध्ये संजू सॅमसन, केएल राहुल आणि इशान किशन या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंमध्ये मोठी टक्कर होणार आहे. आयपीएल 2024 मधील राजस्थान रॉयल्स या संघाचा कर्णधार संजू सॅमसन या हंगामात अप्रतिम फलंदाजी करत आहे. संजू सॅमसन मधल्या फळीत फलंदाजी करतो. तर केएल राहुल आणि इशान किशन हे दोघे देखील उत्तम खेळी खेळत आहेत.

T20 विश्वचषक 2024 1 जूनपासून सुरू होणार आहे. दरम्यान, यावेळी भारताला अ गटात ठेवण्यात आले आहे. ज्यातमध्ये पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि यूएसए यांचाही समावेश आहे. या विश्वचषकातील पहिला सामना टीम इंडियाला आयरलैंविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना 5 जून ला न्यूयॉर्कमध्ये खेळला जाईल. तर टीम इंडियाचा दुसरा सामना 9 जूनला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. यानंतर, टीम इंडियाचा तिसरा सामना 12 जून रोजी यूएसके सोबत होईल, तर टीम इंडिया शेवटचा सामना 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध खेळेल.