नगर जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा दणका

जिह्यातील काही भागांनाही अवकाळीने दणका दिला. शुक्रवारी (12 रोजी) सायंकाळी वादळी वाऱयासह आलेल्या पावसाने नगर तालुक्यातील काही भागांना जबरदस्त दणका दिला.

नगर तालुक्यातील सारोळा कासार, खडकी, बाळकी, दहीगाव, साकत, शिरढोण परिसराला वादळी पावसाचा फटका बसला.वादळासह पाऊस आल्याने शेतकऱयांची मोठी धांदल उडाली. कांदापीक झाकण्यासाठी पळापळ झाली.  वादळी वाऱयामुळे खडकी, वाळकी, दहीगाव, साकत येथील संत्रापिकाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.