हवेत उड्डाण केल्यावर बोइंग ड्रीमलाइनरचे तुकडे होण्याची भीती

 

बोइंग 787 ड्रीमलाइनर विमानावरून पुन्हा एकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बोइंग 787 ड्रीमलाइनरमध्ये अनेक त्रुटी असून या विमानाचे उड्डाणावेळी दोन तुकडे होण्याची भीती पुन्हा एकदा व्हिसलब्लोअरने व्यक्त केली आहे. अमेरिकेची हवाई सुरक्षा संस्था फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने तपास केल्यानंतर हे आरोप फेटाळले होते. परंतु यानंतरही बोइंग 787 च्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) व्हिसलब्लोअरच्या दाव्यांची पडताळणी करीत आहे. एका रिपोर्टनुसार, एफएए बोइंग इंजिनीअर व्हिसलब्लोअर सॅम सालेहपूर यांच्या आरोपांची तपासणी करीत आहे.

सालेहपूर यांनी दावा केला होता की, बोइंगने आपल्या 787 ड्रीमलाइनर जेटला बनवताना फारच घाई केली आहे. विमानाला बनवणाऱया कर्मचाऱयांनी विमानाच्या ढाच्याला वेगवेगळय़ा भागाला जोडताना छोटे-छोटे गॅप भरले नाहीत. ते तसेच सोडून दिले आहेत. त्यामुळे विमान उड्डाणावेळी त्याचे दोन तुकडे होऊ शकतात. या विमानाला जास्त घासले जाते. यामुळे याचे आयुष्य कमी असते. परंतु हे प्रवाशांसाठी जीवघेणे ठरू शकते, असे म्हटले आहे.

बार्नेटनेही उठवला होता आवाज

जॉन बार्नेट यांनीही बोइंगच्या 787 ड्रीमलाइनर दर्जावर आक्षेप घेतला होता व याविरोधात आवाज उठवला होता. ते क्वॉलिटी मॅनेजर पंपनीच्या नॉर्थ चार्ल्सटन प्लांटमध्ये काम करत होते. 2017 मध्ये ते बोइंगमधून निवृत्त झाले होते. परंतु 2024 मध्ये ते संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळले होते. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.