के. कविता यांना सोमवारपर्यंत सीबीआय कोठडी

अबकारी कर घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांना विशेष न्यायालयाने आज 15 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी दिली. ईडीने कविता यांना आधीच अटक केल्यामुळे त्या तिहार जेलमध्ये आहेत. गुरुवारी त्यांना सीबीआयनेही अटक केली होती. अबकारी कर धोरण घोटाळ्यातील पैशांचा व्यवहार उघडकीस आणण्यासाठी सीबीआयने कविता यांची चौकशी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.