गोराईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 

अखिल गोराई बौद्धजन विकास संस्थेच्या वतीने गोराई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 13 एप्रिलला रक्तदान शिबीर, चित्रकला आणि हस्तकला स्पर्धा, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम तर रविवार,  14 एप्रिलला सकाळी बाईक रॅली, बुद्धवंदना, सूत्रपठण, दुपारी ‘आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार’ यावर डॉ. प्रतिभा जाधव यांचे व्याख्यान तर संध्याकाळी बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाणार आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.