संत्र्याचा रंग पाहून ते चिडणार नाहीत ना? तेजस्वी यादव यांचा भाजपाला टोला

नवरात्री सुरू असताना हेलिकॉप्टरमध्ये मासे खातानाचा व्हिडीओ राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी एक्सवरून शेअर केला होता. त्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता त्यांनी संत्रा पार्टी करतानाचा नवा व्हिडीओ एक्सवरून शेअर केला आहे. तसेच पोस्टमध्ये लिहिले आहे, हॅलो मित्रांनो, आज आम्ही हेलिकॉप्टरमध्ये नारंगी पार्टी केली. संत्र्याच्या रंगामुळे ते चिडणार तर नाहीत ना, असा सवाल करत भाजपला सणसणीत टोला लगावला.

तेजस्वी यादव यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये माजी मंत्री मुकेश सहानीदेखील होते. आज आम्ही संत्र्यांचा आस्वाद घेत आहोत. भाजपाला या संत्र्याच्या रंगावरून काही आक्षेप नाही ना… ते यालाही धर्माची जोड देऊ शकतात. अशावेळी आम्ही काही खायचे किवा प्यायचे की नाही. जर ही खाण्याची गोष्ट आहे तर ती आम्ही खाणारच, असेही तेजस्वी यादव व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.