कामगारविरोधी ‘बीजेपी’, महायुतीला निवडणुकीत धडा शिकवणारच! राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा निर्धार

संसदेत ‘फोर कोड बिल’ मंजूर करून कामगार कर्गाचे खच्चीकरण करणारे ’बीजेपी’ सरकार आणि त्या सरकारची पाठराखण करणाऱया महायुतीला येत्या लोकसभा निकडणुकीत मतदान न करता धडा शिकवतील आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणतील, असा निर्धार राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून कामगारांनी केला आहे. संघाच्या संयुक्त प्रतिनिधी मंडळाने याबाबत एक ठरावच मंजूर केला आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर होते. यावेळी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी सभेत ठराव मांडला.

एनटीसी मिल चालू न करता कामगारांवर उपासमारीची वेळ आणणारे केंद्र सरकार आणि महायुतीला कामगार वर्ग चांगलाच धडा शिकवेल’, असा ठराव मांडण्यात आला. माजी मुख्यमंत्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने कामगारविरोधी ‘फोर कोड बिला’ची महाराष्ट्रात अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला होता; परंतु महायुतीचे सरकार मात्र कामगार वर्गाकर कुऱहाड चालविण्यास निघाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निकडणुकीत राष्ट्रीय मिल मजदूर संघ बीजेपी आणि महायुतीला धडा शिकवणार आहे. यावेळी खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ शिर्सेकर, बजरंग चक्हाण, सुनील बोरकर, सेक्रेटरी शिकाजी काळे आदींची ठरावाला पाठिंबा देणारी भाषणे झाली. तसेच एक निकडणूक प्रचार समिती गठीत करण्यात आली.