दादरमध्ये आरोग्य शिबीर

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट, आयुर्वेद रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अॅण्ड रीसर्च सेंटरच्या वतीने 7 एप्रिलला दादर पूर्व येथे विनामूल्य कॅन्सर आयुर्वेदिक चिकित्सा सल्ला शिबीर आणि कॅन्सर प्रतिबंध शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृहात सकाळी 9.30 ते दुपारी 12 या वेळेत हे शिबीर होणार आहे. नावनोंदणी -022-24130866 किंवा 8956941776 या क्रमांकावर करावी.