नगरमधील पोलिसांच्या बदली होऊन एक वर्ष झाले तरीही कार्यमुक्त केले नाही; पोलीस निरीक्षक आहेर यांच्या चौकशीचे आदेश

पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेतील 17 कर्मचाऱयांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र, या कर्मचाऱयांना कार्यमुक्त केले नसल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

या संदर्भात पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ता शाकीर शेख यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षकांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

नगर, जिल्हा पोलीस आस्थापना मंडळ यांनी पोलीस कर्मचारी दर्जाचे एकूण 925 व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ते चालक पोलीस शिपाई दर्जाचे एकूण 59 यांच्या 30 एप्रिल 3023 रोजी बदल्या केल्या आहेत. नगर स्थानिक गुन्हे शाखेतील एकूण 31 पोलीस कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलीस महासंचालक यांच्याकडे शेख यांनी 6 एप्रिल 2023 यांनी तक्रार केली होती.

विद्यमान पोलीस अधीक्षकांच्या जिल्हा पोलीस आस्थापना मंडळ यांच्या परवानगीने 31 पोलीस कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या. परंतु एकाही कर्मचाऱयाची नेमणूक स्थानिक गुन्हे शाखेत करण्यात आलेली नाही. परंतु स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी 31 कर्मचाऱयांपैकी 17 कर्मचाऱयांना एक वर्ष उलटूनही कार्यमुक्त करण्यात आलेले नाही व त्या कर्मचाऱयांना जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने मुदतवाढही दिलेली नाही. असे असताना वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करून सदर कर्मचाऱयांना स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत ठेवलेले आहे. त्याचबरोबर अनेक कर्मचारी सायबर पोलीस ठाणे नगर येथे कामाच्या सोयीसाठी दाखवून स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. सदरची बाब नियमाच्या विरोधात आहे.

याबाबत शेख यांनी पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक परीक्षेत्र नाशिक यांच्याकडे तक्रार केली होती व स्थानिक  शाखेत अजून एका पोलीस निरीक्षकाची नेमणूक करावी. सायबर पोलीस ठाण्यामध्येही स्वतंत्र पोलीस निरीक्षकाची नेमणूक करण्यात यावी. आहेर यांनी आपले कर्तव्य पार पाडण्यास कसूर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती. याची विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दखल घेत पोलीस अधीक्षकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा नगरच्या आस्थापना सूचीवर 2 पोलीस निरीक्षक पदे मंजूर असताना 1 पोलीस निरीक्षक पद भरण्यात आलेले आहे. सदरचे पद भरण्याबाबत शेख यांनी 22/08/2021 पासून पाठपुरावा करीत आहे. परंतु आजपर्यंत त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली नाही. या बाबी विचार करता 2 पोलीस निरीक्षकांची नेमणूक करणे आवश्यक असताना ते नेमणूक करण्यात आलेले नाहीत.

एका वर्षापासून अतिरिक्त कारभार

z सायबर पोलीस ठाणे येथे स्वतंत्र पोलीस निरीक्षकपद मंजूर असताना त्या ठिकाणी नवीन अधिकाऱयाची नेमणूक करण्यात आलेली नाही. पोलीस निरीक्षक दर्जाचे अनेक पोलीस निरीक्षक पोलीस नियंत्रण कक्ष उपलब्ध असताना किंवा इतर अतिरिक्त पोलीस निरीक्षक उपलब्ध असूनही नवीन अधिकाऱयाची नेमणूक न करता आहेर यांच्याकडे गेल्या 1 वर्षापासून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.