Lok Sabha Election 2024 : खासगी विमाने-हेलिकॉप्टरच्या दरांचे टेकऑफ…

राज्याच्या ग्रामीण भागापासून दुर्गम भागात लोकसभा निवडणुकांची प्रचारसभासाठी लहान आकाराची खासगी विमाने व हेलिकॉप्टरची मागणी प्रचंड वाढली असून खासगी कंपन्यांच्या चार्टर्ड फ्लाईटचे दर गगनाला भिडले आहेत. विशेष म्हणजे गडचिरोलीत मतदानाच्या काळात माओवाद्यांचा धोका लक्षात घेऊन राज्याच्या गृह विभागाने एअर अॅम्ब्युलन्स पाच दिवसांसाठी भाडय़ाने घेतली आहे.

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच संपूर्ण देशात राजकीय पक्षांकडून खासगी विमान आणि हेलिकॉप्टरची मागणी वाढली आहे. कारण देशपातळीवरील व राज्यातील बडे नेते आणि स्टार प्रचारक व  सेलिब्रेटींना एका दिवसात अनेक प्रचारसभांमध्ये भाषणे करायची असतात. वेळ वाचवण्यासाठी विमान आणि हेलिकॉप्टरशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे सध्याच्या काळात खासगी विमान पंपन्यांचे कमाईचे दिवस आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा माहोल सुरू होण्याच्या आधीच राजकीय पक्षांनी विमानांचे बुपिंग केले आहे.

 

प्रचारासाठी हेलिकॉप्टरच सोयीचे

या काळात विमानांपेक्षा हेलिकॉप्टरला मागणी अधिक आहे. कारण विमान उड्डाणासाठी धावपट्टीची आवश्यकता असते. निवडणूक प्रचारासाठी नेत्यांना अनेकदा दुर्गम भागात जावे लागते. दुर्गम भागात विमानतळ नाही, पण हेलिकॉप्टर कोणत्याही मोकळय़ा जागेत उतरू शकते. सध्याच्या काळात बहुतांश खासगी विमान पंपन्यांकडील लहान विमान आणि हेलिकॉप्टरची बुपिंग फुल झाली आहेत.

विमानहेलिकॉप्टरचे दर हवे

लोकसभा  निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच हेलिकॉप्टरच्या भाडय़ाचे दर गगनाला भिडले आहेत. पाच सीटर सिंगल इंजिनच्या हेलिकॉप्टरसाठी सहा लाख रुपये एका तासासाठी मोजावे लागतात. तीन तासांसाठी हेलिकॉप्टर भाडय़ाने घेतले तर सुमारे 18 लाख रुपये भाडे होते. त्यापेक्षा अधिक वेळ लागला तर प्रत्येक तासासाठी किमान तीन लाख रुपये अतिरिक्त मोजावे लागतात. जीएसटीची रक्कम वेगळी भरावी लागते

 

राज्य सरकारसाठीएअर अॅम्ब्युलन्स

गडचिरोलीत होणाऱया लोकसभेच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एका एअर अॅम्ब्युलन्सचे पाच दिवसांसाठी आरक्षण केले आहे. या विभागात तब्बल 428 अतिसंवेदनशील मतदारसंघ आहेत. मतदानाच्या काळात माओवाद्यांकडून घातपाताची शक्यता आहे. अशा प्रसंगी तातडीने मदत पोहोचवून संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची गरज राज्य सरकारला भासली आहे. त्यामुळे 17 ते 21 एप्रिल या काळासाठी एका खासगी विमान पंपनीच्या एअर अॅम्ब्युलन्सचे आरक्षण केले आहे.