High Court News : शिक्षकाने कानाखाली मारल्यानंतर विद्यार्थीनीने केली आत्महत्या… वाचा पुढे काय झाले

गुजराच उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण प्रकरणात शिक्षकाच्या बाजूने निर्णय देत प्रकरण निकाली काढले. आठ वर्षांपूर्वी एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली होती. आत्महत्या प्रकरणी शिक्षकावर आणि शाळेच्या विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

2016 साली सुरत मधील एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली होती. अभ्यासाच्या कारणावरुन शिक्षकाने विद्यार्थीनीच्या कानाखाली मारली होती. त्यानंतर त्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली. शिक्षकाने कानाखाली मारल्यामुळे आमच्या मुलीने आत्महत्या केली असा आरोप विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांनी शिक्षकावर तसेच शाळेवर लावला आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर शिक्षकाने आणि शाळेच्या विश्वस्तांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या प्रकरणी न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवले. “न्यायालयाची सहानुभूती कुटंबाप्रती असली तरी निर्दोष व्यक्तीला शिक्षा देणे योग्य ठरणार नाही. शिक्षक विद्यार्थ्यांच्या हितासाठी कठोर वागतात. कारण शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे हित महत्वाचे आहे,” असे म्हणत न्यायालयाने शिक्षकाला आणि शाळेच्या विश्वस्तांची निर्दोष मुक्तता केली. तसेच त्यांच्याविरुद्धची पोलीस तक्रार रद्द करण्याचे आदेश दिले.