Lok Sabha Election 2024 – बिहारमध्ये मुकेश सहनीची पार्टी इंडिया आघाडीत?

मुकेश सहनी यांची विकासशील इंसान पार्टी लवकरच बिहारमध्ये इंडिया आघाडीत सहभागी होऊ शकते. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी सहनी यांची चर्चा सुरू असल्याचे वृत्त असून लवकरच सहनी पत्रकार परिषद घेऊन इंडिया आघाडीत सहभागी होण्याबाबत घोषणा करू शकतात, असे सूत्रांनी म्हटले आहे. सहनी यांच्या पार्टीला लोकसभेच्या 2 ते 3 जागा मिळू शकतात. राष्ट्रीय जनता दलदेखील अनेक जागांवर उमेदवारांची चाचपणी करत असून काँग्रेसदेखील 6 जागांवर उमेदवार देण्यासाठी शोधमोहीम राबवत आहे. काँग्रेसने आतापर्यंत 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे तर लालू प्रसाद यादव यांनी डझनभराहून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.