चिराग पासवान यांना झटका; पक्षातील 22 नाराज पदाधिकाऱयांचे राजीनामे

लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या तिकीटवाटपाने नाराज झालेल्या  लोक जनशक्ती पार्टीतील (रामविलास) तब्बल 22 नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या नाराजीचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो. बिहारमध्ये लोजपाला 40 पैकी 5 जागांवर निवडणूक लढवायची आहे. मात्र, तिकीटवाटपानंतर कार्यकर्ते. पदाधिकारी प्रचंड नाराज असल्याचे दिसले.

अलिकडेच लोजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अरुण कुमार यांनी पदाचा राजीनामा दिला. तिकीटवाटपादरम्यान कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते नाराज झाले. माजी खासदार आणि पार्टीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा रेणु कुशवाहा, राष्ट्रीय महासचिव सतीश कुमार, प्रदेश संघटन सचिव रविंद्र सिंह, मुख्य पार्टी विस्तारक अजय कुशवाहा, प्रदेश उपाध्यक्ष संजय सिंह आणि प्रदेश प्रवक्ता विनीत सिंह यांच्यासह तब्बल 22 पदाधिकायांनी पदांचा राजीनामा दिला.