ईडी, सीबीआयनंतर आयटीआरदेखील मोदींच्या महायुतीत

कच्चातिवू बेटावरून सातत्याने नवनवीन वाद उभे राहात आहेत, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. आता तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. ईडी आणि सीबीआयनंतर मोदी यांनी आता आपल्या महायुतीत आरटीआय म्हणजेच माहितीचा अधिकारदेखील महायुतीत सामील केल्याचा सणसणीत टोला स्टॅलिन यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

कच्चातिवू बेट श्रीलंकेला जाण्याला काँग्रेस जबाबदार असून पंतप्रधान मोदी यांनी डीएमके यांनी तामीळनाडूच्या हितांचे रक्षण करण्यासाठी काहीच केले नाही, असा आरोप होत होता. त्यानंतर आता स्टॅलिन यांनी मोदी सरकारला अक्षरशः धारेवर धरले आहे. मोदींना माहीत आहे की आता ते काहीही बोलले तरी लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळेच त्यांनी नौटंकी करण्यासाठी आता आरटीआयचा सहारा घेत आहेत, असे स्टॅलिन म्हणाले.