आयडियल स्पोर्टस् अॅकॅडमीची कॅरम स्पर्धा

आयडियल स्पोर्टस् अॅकॅडमीच्या वतीने येत्या 6 एप्रिलला दिलीप करंगुटकर यांच्या स्मरणार्थ भायखळा येथे शालेय कॅरम स्पर्धेचे आयोजन केले आहे. 15 वर्षाखालील शालेय मुलामुलींसाठी होणाऱया या एकेरी कॅरम स्पर्धेतील आठ विजेत्यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱया शालेय खेळाडूंनी अधिक माहितीसाठी क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर (9987831622) अथवा क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक (90047 54507) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.