IPL 2024 : मयांकचा पदार्पणातच विक्रम

आपल्या वेगवान चेंडूंनी अवघ्या क्रिकेट विश्वाला मोहिनी घालणाऱया स्पीडस्टार मयांक यादवने पदार्पणातल्या दोन्ही सामन्यात प्रत्येकी तीन विकेट आणि सलग सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा पराक्रम केला. आयपीएलच्या पहिल्या दोन्ही सामन्यात आतापर्यंत पाच गोलंदाजांनी प्रत्येकी तीन विकेट टिपले होते तर मयांक सहावा गोलंदाज ठरला. मात्र पहिल्या दोन्ही सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकणारा तो आयपीएलचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने पदार्पणाच्या सामन्यात 27 धावांत 3 तर दुसऱया सामन्यात 14 धावांत 3 विकेट बाद करण्याची किमया दाखवली होती.