व्हीपीएमच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचा अॅथलीट क्लब म्हणून आपल्या नावाची मोहोर उमटवणाऱया व्हीपीएम क्लबच्या चार खेळाडूंची राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. येत्या 5 ते 7 एप्रिलदरम्यान पाटलीपुत्र, पाटणा येथे राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी चारही खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील. याशिवाय राष्ट्रीय सीआयएससीई शालेय संघातून व्हीपीएमचे दोन खेळाडू आपली चमक दाखवणार आहेत.

व्हीपीएम क्लबने राष्ट्रीय स्पर्धेत गेली दोन दशके आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला आहे. या यशामुळे क्लबच्या अनेक खेळाडूंनी सरकारी, निमसरकारी, खासगी आस्थापनांमध्ये तसेच शाळा आणि कॉलेजमध्ये खेळाडू तसेच प्रशिक्षक म्हणून नोकऱया मिळवल्या आहेत.

निवड झालेले खेळाडू गाथा कबीर – थाळीफेक,  तनिश देसले – थाळीफेक, अन्वेशा रहाटे – गोळाफेक, जनई पाटील – तिहेरी उडी,  शैवी मेहता – 100 मी. अडथळा आणि नित्या रावत – हातोडाफेक (सीआईएससीई ).