IPL 2024 : पंजाबचे आव्हान होतेय खडतर

सलग दोन पराभवांमुळे पंजाब किंग्जचे स्पर्धेतील आव्हान खडतर झालेय. उद्या गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांची गाठ पडतेय. गुजरातलाही एका सामन्यात पराभवाची झळ बसल्यामुळे ते फार सुस्थितीत आहेत असेही नाही; पण उद्या गुरुवारी पंजाबने गुजरातच्या गोलंदाजांना रोखले नाही तर त्यांच्यासाठी प्रत्येक सामना करो या मरो असाच असेल.

गुजरात टायटन्सने मुंबई आणि हैदराबाद या दोन संघांना हरवलेय, तर पंजाबला केवळ दिल्लीविरुद्ध विजय नोंदविता आलाय. उर्वरित दोन्ही सामन्यांत ते हरलेत. जर उद्या पंजाबला गुजरातविरुद्ध विजय नोंदविता आला तर त्यांचे मनोधैर्य उंचावेल आणि ते विजयाच्या ट्रकवर येण्याचा प्रयत्न करतील. गुजरातसाठी मोहितच्या गोलंदाजीची मोहिनी गेल्या दोन सामन्यांत चालली आहे. हा इम्पॅक्ट प्लेअर सामने फिरवतोय. याच्या मोहिनीपासून पंजाबच्या फलंदाजांना दूर राहावे लागणार आहे. तसेच राशीद खान आणि नूर अहमद यांच्या फिरकीलाही पंजाबला भिडावे लागणार आहे. गुजरातलाही आपल्या आव्हानाला अधिक बळकटी देण्यासाठी पंजाबला पाडावेच लागणार आहे. शुबमन गिल, डेव्हिड मिलर, साई सुदर्शन विजय शंकर यांना आपल्या  घरच्या मैदानावर बॅटची कमाल दाखवावीच लागेल. अन्यथा गुजरातचाही संघर्ष सुरू होईल.

संभाव्य संघ

गुजरात टायटन्स वृद्धिमान साहा, शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, अझमतुल्लाह उमरझाई, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिथा, राशीदर खान, नूर अहमद, मोहित शर्मा, उमेश यादव. n  पंजाब किंग्ज शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टॉ, सॅम करन, लिव्हिंग स्टोन, शशांक सिंग, हरप्रीत बराड, राहुल चहर, हर्ष पटेल, कगिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.