उद्यापासून जेईई मेन परीक्षा

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात येणारी दुसऱया सत्रातील जेईई मेन परीक्षा येत्या गुरुवार म्हणजेच 4 एप्रिलपासून सुरू होत आहे. देश आणि विदेशातील 319 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे.

देशातील आयआयटी, एनआयटीसह इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये तसेच विविध शिक्षण संस्थांमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई मेन ही परीक्षा ‘एनटीए’मार्फत घेण्यात येते.  दरवर्षी जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रांत ही परीक्षा घेतली जाते. पहिल्या सत्रासाठी देशभरातून तब्बल 12 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बी.ई. आणि बी.टेक. अभ्यासक्रमासाठी 4, 5, 6, 8, 9 एप्रिलला ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6 अशा दोन सत्रांत होणार आहे, तर बी.आर्च, बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमासाठी 12 एप्रिल रोजी परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12.30 या कालावधीत घेतली जाईल.

परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना

n हॉलतिकीट, अलीकडील पह्टो आणि वैध पह्टो आयडी पुरावा अनिवार्य आहे.

n रिपार्ंटग वेळेच्या किमान 30 मिनिटे आधी पेंद्रावर पोहोचा. n प्रवेशाच्या वेळेनंतर उमेदवाराला प्रवेश मिळणार नाही.

n परीक्षा पेंद्रामध्ये मोबाईल पह्न, अभ्यास साहित्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा कोणत्याही अनधिकृत वस्तू नेण्याची परवानगी नाही. n मधुमेही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ठिकाणी साखरेच्या गोळय़ा, फळे आणि स्वच्छ पाण्याच्या बाटल्या नेता येतील. n चॉकलेट, पँडी आणि सँडविच यांसारख्या पॅकेज स्नॅक्सला परवानगी नाही.