उबेरचा प्रवास विमानापेक्षा महाग?

पुण्याहून बंगळुरूला जाण्यासाठी फ्लाइटने केवळ 3500 रुपये मोजावे लागले, परंतु बंगळुरू विमानतळावरून घरी पोहोचण्यासाठी उबेरला 2 हजार रुपये द्यावे लागले. या दोन्ही प्रवासामधील फरक केवळ दीड हजाराचा होता. एक्सवरील युजर मानसी शर्मा हिने ही पोस्ट केली आहे. उबेरला दिलेल्या भाडय़ाचा क्रीनशॉटही तिने जोडला आहे. या पोस्टला दहा लाख लोकांनी पाहिले आहे.