बिहारमध्ये जीतन राम मांझी यांची परीक्षा

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि त्यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा (हम) या पक्षाची मोठी परीक्षा असणार आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला गया, औरंगाबाद, नवादा आणि जुमई या चार जागांवर मतदान होणार आहे. यातील लोकसभेच्या तीन जागांवर मांझी यांच्या पक्षाचे सर्व चार आमदार आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱया इमामगंज येथून जीतन राम मांझी स्वतः आमदार आहेत. दरम्यान, गेल्या निवडणुकीत मांझी यांना या मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता. मोदी लाटेत हिंदुस्थानी अवाम मोर्चा एकही जागा जिंकू शकली नाही.