वादग्रस्त विधाने नकोत; दिलीप घोष यांना  आयोगाने फटकारले

महिलांविरोधात आक्षेपार्ह विधाने केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने भाजप खासदार दिलीप घोष यांना फटकारले आहे. कुठलीही विधाने करताना सावध राहा. सोबत काँग्रेस नेत्या सुप्रिया सुनेत यांनाही निवडणूक आयोगाने सुनावले. आक्षेपार्ह विधाने करू नका. आयोगाची नजर सातत्याने तुमच्यावर राहील. दोघांनी आक्षेपार्ह विधाने करून निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याकडे निवडणूक आयोगाने लक्ष वेधले.

भविष्यात सभांमध्ये असो किंवा कुठेही बोलताना सावधानता बाळगा, असे निवडणूक आयोग म्हणाले. भाजप खासदार दिलीप घोष आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्याकडून निवडणूक प्रचारात आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने निदर्शनास आणून दिले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका केल्याने आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. दरम्यान, निवडणूक आयोगाने दोन्ही नेत्यांना नोटिसा बजावून भविष्यात सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.