IPL 2024 : वानखेडे ‘रोहितमय’, कर्णधार हार्दिकचे स्वागत नाहीचं

आयीपएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र नाणेफेक करतेवेळी कर्णधार पंड्याचा चेहरा मात्र चांगलाच पडला होता.

मुंबई इंडियन्सने आपला कर्णधार बदलला मात्र रोहित शर्माच्या चाहत्यांना मुंबईचा हा निर्णय काही पटला नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यापासूनच मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार हार्दिक पंड्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहेत. पहिल्या सामन्यापासूनं रोहितचे चाहते हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. दरम्यान पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसरा सामना खेळण्यासाठी मुंबईचा संघ घरच्या मैदनावार वानखेडेमध्ये दाखल झाला. सामना सुरू होण्यापूर्वी स्टेडियम बाहेर रोहितच्या चाहत्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. तसेच मोठ्या प्रमाणात रोहितच्या नावाच्या जर्सीची खरेदी करताना चाहते दिसत होते.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये हार्दिक पंड्याला मोठ्या प्रमाणात रोहितच्या चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मुबंईमध्ये परिस्थिती बदलेल अशी शक्यता होती. मात्र मुंबईमध्ये सुद्धा परिस्थिती जैसे थे आहे. नाणेफेक करतेवेळी रोहितच्या नावाच्या जयघोषाने संपूर्ण वानखेडे स्टेडीयम चाहत्यांनी दणाणून सोडले आणि संपूर्ण स्टेडियम ‘रोहितमय’ झालेले पहायला मिळाले.