Lok Sabha Election 2024: रायगड लोकसभा मतदारसंघ – सुनिल तटकरे विजयी

raigad-lok-sabha-constituency

रायगड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रायगड जिल्ह्यामधील ४ आणि रत्‍नागिरी जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. अनंत गीते (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि सुनिल तटकरे (अजित पवार राष्ट्रवादी) यांच्यात प्रमुख लढत आहे.

 

– सुनिल तटकरे १७ वी फेरीत ४६ हजार ९०५ मतांनी आघाडीवर

– सुनिल तटकरे १४ हजार मतांनी आघाडीवर

– अनंत गीते ३, ५०० मतांनी आघाडीवर

– सुनिल तटकरे आघाडीवर अनंत गीते पिछाडीवर

– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनंत गीते आघाडीवर

गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा निकाल

पंधरावी लोकसभा २००९-२०१४ अनंत गंगाराम गीते शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ अनंत गंगाराम गीते शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९- सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस (आता अजित पवार गट)