Lok Sabha Election Result : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मशाल आघाडीवर

hatkanangle-lok-sabha-constituency

हातकणंगले हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधील ४ आणि सांगली जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सत्यजित पाटील सरूडकर आणि मिंधे गटाचे धैर्यशील माने व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर हे पहिल्या फेरीत 66 मतांनी आघाडीवर राहिले. त्यांना 20 हजार 922 मते मिळाली तर शिंदे गटाचे खासदार माने यांना 20 हजार 852 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी आमदार खासदार राजू शेट्टी यांना 11 हजार 312 मते मिळाली.

दुसऱ्या फेरीत 1 हजार 448 मताने सत्यजित पाटील आघाडीवर राहिले तर आता तिसऱ्या फेरीत तब्बल 4 हजार 74 ची आघाडी घेतली आहे. या फेरीत सत्यजित पाटील (21 हजार 992), धैर्यशील माने -(19 हजार 366), राजू शेट्टी – (7 हजार 465) अशी मते मिळाली आहेत.

गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा निकाल 

पंधरावी लोकसभा २००९-२०१४ राजु शेट्टी स्वाभिमानी पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ राजु शेट्टी स्वाभिमानी पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- धैर्यशील माने शिवसेना (आता शिंदे गट)