अकोला हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या अकोला जिल्ह्यामधील ५ व वाशिम जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. अनुप धोत्रे (भाजप), प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात लढत आहे.
– भाजपचे अनुप धोत्रे आघाडीवर
– प्रकाश आंबेडकर, अनुप धोत्रे पिछाडीवर, अभय पाटील आघाडीवर
– अभय पाटील आघाडीवर, भाजपचे अनुप धोत्रे पिछाडीवर
गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल
- तेरावी लोकसभा १९९९-२००४ प्रकाश यशवंत आंबेडकर भारिप बहुजन महासंघ
- चौदावी लोकसभा २००४-२००९ संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष
- पंधरावी लोकसभा २००९-२०१४ संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष
- सोळावी लोकसभा २०१४-२०१९ संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष
- सतरावी लोकसभा २०१९- संजय धोत्रे भारतीय जनता पक्ष