भारतीय कामगार सेनेमुळे मिसाळ कुटुंबाला मदतीचा हात

भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ओमेगा एंटरप्राईजेस पंपनीतील सुखदेव मिसाळ या मृत कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली आहे. नुकताच 1 लाख 60 हजार रुपयांचा मदतनिधी मिसाळ कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला आहे तसेच त्यांच्या वारसास नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. याबद्दल मिसाळ कुटुंबियांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ओमेगा एंटरप्राईजेस (पार्ंकग विभाग) पंपनीतील सुखदेव मिसाळ या कामगाराचा अलिकडेच मृत्यू झाला. कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे मिसाळ कुटुंबियांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर भारतीय कामगार सेना पार्ंकग युनिट कमिटी व कामगारांनी मिसाळ कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी निधी जमवला. तसेच भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या प्रयत्नामुळे व्यवस्थापकडून देखील निधी मिळाला. अशापद्धतीने 1 लाख 60 हजार रुपयांचा मदत निधी अजित साळवी आणि संजय कदम यांच्या हस्ते मिसाळ कुटुंबियांना सुपूर्त करण्यात आला.

भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, राजा ठाणगे, मयूर वणकर, सूर्यकांत पाटील, योगेश आवळे, सहचिटणीस मिलिंद तावडे, जगदीश निकम, विजय शिर्पे, निलेश ठाणगे, दिनेश पाटील, विजय तावडे, युनिट कमिटी व कामगार उपस्थित होते.